ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.यामुळे शरीरातील उर्जा कमी होते. यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा.
संत्री, किवी आणि पेरु या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
टोमॅटोमध्ये लाइकोपीनसोबत पाण्याचे प्रमाण जास्त असते.
पालकमध्ये आयरन आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात. जे हायड्रेशनसाठी देखील मदत करतात
दहीमध्ये प्रोबायोटिक्स असते. म्हणून हायड्रेशनसाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे.
ग्रीन टी किंवा हर्बल टी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
गाजर, मुळा, काकडी आणि बीटरुट यांची कोशिंबीर शरीराला हायड्रेटेड ठेवते.
या व्यतिरिक्त दिवसभर शरीराला आवश्यक पुरेशा प्रमाणात पाणी प्या. तसेच चांगली झोप घ्या. आणि व्यायाम करा.