Manasvi Choudhary
अनेकदा मटणाच्या दुकानात मटण घ्यायला गेल्यावर मटण ताजे आहे की शिळे हे कळतच नाही.
मटण ताजे की आहे की शिळे ओळखण्यासाठी मटणचा रंग पाहावा.
मटण ताजे असेल तर त्याचा रंग अगदी गडद असतो. पण शिळ्या मटणाचा रंग काळपट फिका पडलेला असतो.
मटण ताजे असेल तर त्याचा वास येत नाही. पण शिळे मटण असेल तर त्यावर प्रक्रिया होते ते कुजायला लागते ज्यामुळे त्याचा दुर्गंध येतो.
मटण घेण्यापूर्वी त्याला हात लावून पाहा. मटण हाताला चिकट लागले तर ते शिळे आहे असे समजावे.
मटण शिजायला वेळ लागला त्याचा रंग काळपट दिसू लागला की समजावे मटण खूपच शिळे आहे.