Manasvi Choudhary
झोपेतून उठल्यानंतर सकाळी भूक लागणे ही गोष्ट सामान्य आहे.
रात्री केलेले जेवण आणि सकाळी उठण्याची वेळ यामध्ये जवळपास ८ ते ९ तासांचे अंतर असते यामुळे सकाळी भूक लागते.
अनेकजण सकाळची सुरूवात चहा आणि कॉफी पिऊन करतात.
तर काहीजण जिमला जाण्यापूर्वी प्री वर्कआऊट नाश्त्यात केळीचे सेवन करतात.
मात्र सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
केळी या फळामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते यामुळे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशिअमचे आणि रक्तातील पोटॅशिअमचे प्रमाण वाढते.
केळीमध्ये आम्ल असते यामुळे रिकाम्यापोटी केळी खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन समस्या उद्भवते.