Healthy Evening Snacks: संध्याकाळच्या हलक्या भुकेवर भारी उपाय, खा काहीतरी टेस्टी आणि हेल्दी

Saam TV News

पौष्टीक पदार्थ

रोजचे चिप्स, बिस्किट यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊन कंटाळला असाल आणि काहीतरी टेस्टी अन् हेल्दी खाण्याचा विचार करत असाल, तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या या पौष्टिक पदार्थांबद्दल नक्की जाणून घ्या.

Healthy Evening Snacks | pinterest

भाजलेले चणे:

भाजलेले चणे हा फायबर आणि प्रथिनांचा एक किफायतशीर पर्याय आहे. हे प्रवासात किंवा ऑफिसच्या ब्रेक मध्ये सहज खाता येतात. यांमुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत होते.

Roasted chickpeas | pinterest

दही:

दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते. दही हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असते, तसेच ते पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. दह्यात साखर न घालता, ते ताज्या फळांसोबत खाऊ शकता.

CURD | pinterest

फळं:

फळांमधून शरीराला भरपूर फायबर आणि विविध आवश्यक पोषक घटक मिळतात. तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार तुम्ही योग्य फळांची निवड करू शकता.

FRUITS | pinterest

नट्स (सुकामेवा):

नट्समधून शरीराला हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि अनेक पोषक घटक मिळतात. प्रवासात किंवा कामाच्या वेळी हे खाणे सोयीचे असते आणि यांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

nuts | pinterest

मोड आलेली कडधान्य:

कडधान्ये ही प्रथिने, फायबर आणि पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असतात. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. कडधान्ये उसळ करून किंवा शिजवून खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते.

Sprouted legumes | pinterest

पनीर:

शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम मिळवण्यासाठी पनीर हा एक उत्तम पर्याय आहे. पनीर हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

paneer | pinterest

दूध आणि बदाम:

दुधामधून शरीराला भरपूर प्रथिने आणि कॅल्शियम मिळते, तर बदामातून हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई मिळते. हा एक परिपूर्ण आणि ऊर्जा देणारा आहार आहे.

Milk and almonds | pinterest

NEXT : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

Sabudana Vada Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा