Eggless Banana Cake : लहान मुलांनसाठी एग्लेस बनाना केक करायचा आहे? लगेच नोट करा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बनाना केक

बनाना केक हा पोष्टिक केक आहे आणि तो तितकाच स्वादिष्टसुध्दा आहे. या केकमध्ये अंड्याचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता.

Banana Cake | GOOGLE

साहित्य

पिकलेले केळी, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही, साखर आणि बटर इ. साहित्य लागते.

Banana | GOOGLE

स्टेप १

केळी मॅश करुन घ्या आणि मॅश केलेली केळी दह्यासोबत मिक्स करा. असे केल्यास केकमध्ये सॉफ्टनेस आणि गोडपणा येतो.

Smash Banana | GOOGLE

स्टेप २

आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि गव्हाचे पीठ मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे केकला हलका फुलका बनवण्यास मदत करते.

Baking Powder | GOOGLE

स्टेप ३

साखर आणि बटर एकत्र फेटून घ्या, जोपर्यंत मिश्रण हलके आणि मऊ होत नाही. यामुळे केक हलका आणि हवेशीर बनला जातो.

Sugger And Butter | GOOGLE

स्टेप ४

सुक्या मिश्रणाला आता ओल्या मिश्रणामध्ये मिक्स करा आणि हलक्या हाताने सगळे मिश्रण मिक्स करा.

Baking Batter | GOOGLE

स्टेप ५

तयार केलेल्या बॅटरला बेकिंग टिनमध्ये टाका आणि १८० डिग्री वर ३५ ते ४० मिनिटे बेक करण्यास ठेवा.

Banana Cake | GOOGLE

सर्व्ह करा

केक थंड झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुट्स टाकून सजवा. तुम्हाला हवे असल्यास वरुन चॉकलेट टाकू शकता. सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.

Banana Cake | GOOGLE

Mawa Peda Modak Saran : माघी गणेशोत्सवासाठी बनवा मावा अन् पेठ्यांपासून मोदकांचे सारण, लगेच नोट करा रेसिपी

Modak Saran | GOOGLE
येथे क्लिक करा