Healthy Diet : हिवाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे ७ पदार्थ, जे आरोग्यासाठी आहेत अत्यंत फायदेशीर

Saam Tv

गूळ

गुळाची चहा किंवा तो असाच खाल्ल्यास शरीराला फायदा होतो. गुळामध्ये लोह , पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे आढळतात. हे शरीर सक्रिय ठेवण्यास आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.

jaggery | pinterest

तीळ

हिवाळ्यात तीळ खाणे आरोग्यासाठी खूप गुणकारी ठरते. यामध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने , फायबर आणि हेल्दी फॅट्ससारखे पोषक घटक असतात. कॅल्शियम हाडे मजबूत ठेवते, तर लोह शरीरात रक्त तयार करण्यास मदत करते.

Sesame seeds | pinterest

हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात पालक, मेथी, मोहरी आणि बथुआ यांसारख्या हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात. याभाज्या व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन K, फोलेट, लोह आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवण्यास मदत करते, तर फोलेट लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते.

green vegetables | pinterest

तूप

हिवाळ्यात आहारात तुपाचा समावेश करावा. तुपात फॅट्स आणि व्हिटॅमिन A, E व K यांसारखे फॅट-सॉल्युबल व्हिटॅमिन असतात. हे शरीर सक्रिय ठेवण्यासोबतच अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यास मदत करतात. तुपात ब्युटिराइट नावाचे शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड असते, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, यात कॅलरीज जास्त असल्याने ते मर्यादित प्रमाणातच खावे.

ghee | pinterest

मुळावर्गीय भाज्या

हिवाळ्यात गाजर, बीट आणि रताळे यांसारख्या जमिनीखालील भाज्या भरपूर मिळतात. गाजरात बीटा-कॅरोटीन असते, जे शरीर व्हिटॅमिन A मध्ये बदलते डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम. रताळ्यात फायबर आणि पोटॅशियम असते, तर बीटामध्ये फोलेट आणि नॅचरल नायट्रेट्स असतात जे रक्ताभिसरण सुधारतात.

Root vegetables | pinterest

बदाम आणि अक्रोड

बदाममध्ये व्हिटॅमिन E, प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. व्हिटॅमिन E एक अँटिऑक्सिडंट आहे जे पेशींचे रक्षण करते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे दोन्ही ड्रायफ्रूट्स शरीराला ऊर्जा देतात आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात.

Almonds and walnuts | pinterest

अंडी, चिकन आणि मासे

हिवाळ्यात शरीराला प्रोटीन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आहारात अंडी, चिकन आणि माश्यांचा समावेश करा. अंड्यात उत्तम दर्जाचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 व D असतात. चिकन स्नायूंच्या वाढीसाठी आणि मर्मतसाठी फायदेशीर ठरते, तर माश्यांमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदय व मेंदूसाठी उत्तम मानले जाते.

Eggs, chicken, and fish | pinterest

NEXT : कोल्डड्रिंक्स सोडा, हे ७ नैसर्गिक ड्रींक वाढवतील तुमची इम्युनिटी आणि एनर्जी

digestion boosting drinks | saam tv
येथे क्लिक करा