digestion boosting drinks: कोल्डड्रिंक्स सोडा, हे ७ नैसर्गिक ड्रींक वाढवतील तुमची इम्युनिटी आणि एनर्जी

Saam TV News

नारळ पाणी

शरीराला त्वरित हायड्रेट करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि थकवा दूर करतात.

coconut water | pinterest

लिंबू पाणी

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स करते, इम्युनिटी वाढवते आणि त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते.

lemon water | pinterest

ताक

पचनासाठी हलके आणि उत्तम असणारे ताक पोट थंड ठेवते. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनतंत्र मजबूत करतात आणि गॅस किंवा ॲसिडिटीच्या त्रासापासून आराम देतात.

buttermilk | pinterest

बेलचा सरबत

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पोटाला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी बेलचा सरबत खूप गुणकारी मानला जातो.

Wood Apple Drink | pinterest

ग्रीन टी

अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ग्रीन टी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करते.

green tea | pinterest

ताज्या फळांचा रस

संत्रा,डाळिंब किंवा मोसंबी यांसारख्या ताज्या फळांचे जुस शरीराला आवश्यक पोषण देतात आणि त्वरित ऊर्जा पुरवतात.

fruits juice | pinterest

पुदिना-जिरे पाणी

पुदिना आणि जिऱ्यापासून तयार केलेले पाणी पोटाच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. हे शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवून पचनक्रिया सुधारते.

Mint Cumin Water | pinterest

टीप

कोल्डड्रिंक्सऐवजी या नैसर्गिक पेयांना आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनवा, ज्यामुळे तुम्ही निरोगी, तंदुरुस्त आणि दिवसभर एनर्जेटीक राहू शकाल.

digestion boosting drinks | pinterest

NEXT : या दिवाळीत घरीच कुरकुरीत मूग डाळीची चकली बनवा, पाहुण्यांना नक्कीच आवडेल

CRISPY MOONG DAL CHAKLI RECIPE EASY HOME-MADE DIWALI FARAL SNACK | SAAM TV
येेथे क्लिक करा