या दिवाळीत घरीच कुरकुरीत मूग डाळीची चकली बनवा, पाहुण्यांना नक्कीच आवडेल

Saam Tv

दिवाळीत बाजारातील चकली विसरा

घरच्या घरी बनवा मूगडाळीची खमंग आणि कुरकुरीत चकली. चवही जबरदस्त आणि बनवण्याची पद्धतही सोपी

mug dal chakali | PINTEREST

साहित्य

पिवळी मूगडाळ १ कप,तांदळाचं पीठ २ कप,पांढरे तीळ १ चमचा,ओवा अर्धा चमचा,हिंग, हळद, तिखट आणि मीठ,गरम तेल किंवा तूप २ ते ३ चमचे

mug dal chakali | PINTEREST

मूगडाळ भिजवा

एक कप पिवळी मूगडाळ घ्या. ती २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

mug dal chakali | PINTEREST

चकलीचं पीठ तयार करा

एका भांड्यात तांदळाचं पीठ आणि मूगडाळीची पेस्ट एकत्र करा. त्यात तीळ, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ आणि गरम तेलाचं मोहन घाला.

mug dal chakali | PINTEREST

पीठ मळताना ही गोष्ट लक्षात ठेवा

सर्व साहित्य एकत्र करून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घाला. मऊसर पीठ मळून घ्या. तयार पीठ १० मिनिटे झाकून ठेवा.

mug dal chakali | PINTEREST

चकलीला गोलाकार आकार द्या

चकलीच्या साच्याला तेल लावा. त्यात तयार पीठ भरा आणि बटर पेपर किंवा सुती कापडावर गोलाकार चकल्या पाडून घ्या.

mug dal chakali | PINTEREST

चकली तळताना घ्या ही काळजी

कढईत तेल मध्यम गरम करा. चकल्या अलगद तेलात सोडा. मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

mug dal chakali | PINTEREST

तयार झाली खमंग मूगडाळ चकली

तळलेल्या चकल्या पूर्ण थंड होऊ द्या.त्यानंतर हवाबंद डब्यात साठवा. दिवाळीच्या फराळात चहा आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्व्ह करा

mug dal chakali | PINTEREST

NEXT : पोट हलके आणि एनर्जेटिक ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात या 8 सवयी सामील करा

8 DAILY HABITS TO KEEP YOUR TUMMY LIGHT AND ENERGETIC | saam tv
येथे क्लिक करा