Priya More
ज्वारीच्या पिठाचे सूप बनवण्यासाठी २ चमचे ज्वारीचे पीठ घ्या.
पातेल्यामध्ये २ चमचे ज्वारीचे पीठ टाकून त्यामध्ये १ ग्लॅस पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
कढईमध्ये १ ते २ चमचे तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेला लसून, एक चमचा बारीक चिरलेले आले, कोथिंबिरचे चिरलेले देठ टाकून व्यवस्थित परतून घ्या.
या मिश्रणात एक छोटा चमचा तीळ टाकून ते परतून घ्या आणि त्यामध्ये पीठाचे मिश्रण टाकून व्यवस्थित हलवा.
सूपमध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकून ते पातळ करत राहा. पण हे पाणी गरम असणे आवश्यक आहे.
सूपाला उकळी येऊ लागली की त्यामध्ये मीठ, जिरे पूड, धने पूड, मिरची पावडर टाका. गॅस मंद आचेवर ठेवून कढईवर झाकण ठेवा.
ज्वारीचे सूप तयार झाल्यानंतर त्यावर तुम्ही चिरलेली कोथिंबिर टाकून हे सूप पिऊ शकता.
हे सूप आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या सूपमुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते.
ज्वारीचे हे सूप खूपच स्वादिष्ट, रूचकर, खमंग लागते. हे सूप पोष्टीक देखील आहे.