Priya More
कॅन्सरची लक्षणे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार असतात. कॅन्सर झाल्यावर सुरूवातीला अनेक लक्षणे दिसतात.
कॅन्सरच्या प्रकारांमध्ये स्तनांचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर हे आहेत.
कॅन्सर झाल्यास सुरूवातीला वजन कमी होते आणि भूक मरते.
कॅन्सर झाल्यास आपल्या शरीरात कुठेही गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होतो.
कॅन्सर झाल्यानंतर घशात वेदना होतात. अनेकदा श्वास घ्यायला देखील त्रास होतो.
कॅन्सर झाल्यास अनेकदा सतत खोकला येतो किंवा घशात खवखव होते.
कॅन्सरमध्ये सुरूवातीच्या लक्षणांमध्ये सतत ताप येतो. खोकताना घशातून रक्त येते.
कॅन्सर झाल्यानंतर प्रचंड थकवा येतो. कितीही विश्रांती घेतली तरी थकवा जात नाही.
कॅन्सर झाल्यानंतर त्वचा गडद होते. त्वचा आणि डोळे पिवळे होतात.
कॅन्सर झाल्यानंतर लघवी करताना वेदना होतात. लघवीतून रक्त येते.