Manasvi Choudhary
सायकांळच्या नाश्त्याला तुम्हाला देखील चटपटीत काहीतरी खायचं असेल तर तुम्ही चटपटीत भेळ खाऊ शकता.
भेळीचे अनेक प्रकार आहेत ज्याची चव तुम्ही आस्वाद घेऊ शकता. घरी देखील भेळ बनवू शकता.
ओली भेळ अनेकांच्या आवडीचा प्रकार आहे. चिंच-गुळाची गोड चटणी, पुदिना-मिरचीची तिखट चटणी आणि लसणाची चटणी टाकून ही भेळ बनवली जाते.
कुरकुरीत आणि चवदार सुकी भेळ भाजलेले शेंगदाणे आणि डाळिया घालून केली जाते. यात सुकी लसूण चटणी, चाट मसाला मिक्स करा.
आजकाल चायनीज प्रकारामध्ये अनेकांना चायनीज भेळ खायला आवडते. कुरमुऱ्यांऐवजी तळलेले नूडल्स यात असतात.
कुरमुऱ्यांऐवजी उकडलेले स्वीट कॉर्न भेळ तुम्ही बनवू शकता. लिंबू, काळी मिरी पावडर टाकल्यास चवदार लागते.
सकाळी जिमला जाणाऱ्यासाठी खास हेल्दी आणि टेस्टी मोड आलेल्या कडधान्यांची भेळ उत्तम आहे. यात तुम्ही काकडी आणि गाजराचा मिक्स करा.