ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा एक अतिशय सामान्य आजार आहे जो नवजात शिशुपासून ते वृद्धांपर्यंत कोणत्याही महिलेला होऊ शकतो.
युटीआयचा संसर्ग प्रत्येक १० मधून ६ महिलांना होऊ शकतो, त्याचे कारण म्हणजे नियमीत स्वच्छता न पाळणे.
जेव्हा बॅक्टेरीया गुदाशयातून मुत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा युटीआय आजार होत असतो.
युटीआयमध्ये लघवीची तीव्र जळजळ, लघवी करताना वेदना लघवीमधून रक्त येणे असे लक्षणे दिसून येतात.
युटीआयचा संसर्ग टाळण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासोबतच लघवीमघून बॅक्टेरीया बाहेर पडण्यास मदत होत असते.
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्यास मूत्रमार्गात बॅक्टेरीया वाढण्याची शक्यता असते.
फळे भाज्या आणि धान्य यांचे नियमित सेवन केल्यास शरीराताल रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़