Priya More
बदललेल्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक जण काहीना काही आजाराने त्रस्त आहेत.
अनेक व्यक्तींना मुळव्याधाचा त्रास असतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
आयुर्वेदानुसार आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून या आजारावर बऱ्यापैकी उपचार करता येतात.
खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
बद्धकोष्ठता वेळीच बरी न झाल्यास त्याचे रुपांतर मुळव्याधमध्ये होऊ शकते. मूळव्याध झाल्यास प्रचंड त्रास होतो.
मूळव्याध हा एक आजार आहे ज्यामध्ये बसणे खूप कठीण होते. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर तसेच गुदाशयाच्या खालच्या भागात सूज येते.
मुळव्याध जास्त वजन असलेल्या व्यक्तींना आणि गर्भवती महिलांना होऊ शकतो.
ज्या व्यक्ती फायबर असलेले अन्न खातात त्यांना मूळव्याध होण्याचा सर्वात जास्त धोका असतो.
बद्धकोष्ठता किंवा अतिसाराच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो.
जड वस्तू नियमित उचलणाऱ्या व्यक्तींना आणि शौचाला बसताना ताण देणे आणि जास्त वेळ बसून राहणे यामुळे मूळव्याध होऊ शकतो.