Bharat Jadhav
उन्हाळ्याची चाहूल लागतात बाजारात लाल लाल कलिंगड विक्रीसाठी येतात.
कलिंगडमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए आणि सी, फायबर, लाइकोपीन, अँटीऑक्सिडंट्स, पाणी असते, हे आरोग्यासाठी चांगलं असते.
शुगर (मधुमेह) असलेल्या लोकांनी कलिंगड खावे की नये? यासंदर्भात अनेकांचा गोंधळ असतो.
कलिंगडमध्ये पाणी मुबलक प्रमाणात असते. 120 ग्रॅम कलिंगडमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स हा पाच इतक्या प्रमाणात असतो.
कलिंगडमुळे शुगर वाढत नाही. ताजे कलिंगड शुगर असलेले रुग्ण खावू शकतात.
कलिंगडचे ज्यूस मात्र शुगर असलेल्या रुग्णांसाठी चांगले नसतं. कारण ज्यूसचा ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असते.
शुगर असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रणात असेल तेव्हाच ते कलिंगड खाऊ शकतात.
शुगर नियंत्रणात नसलेल्या रुग्णांनी कलिंगड खाणे टाळावे.
या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)