Shraddha Thik
आपण नेहमी ऐकतो की, आठ तासांची झोप आवश्यक आहे. अनेक मोठ्या तज्ज्ञांनी देखील हेच सांगितले आहे. झोप पुरेशी न झाल्यास तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
जगभरात झोपेवर 153 हून अधिक संशोधन केले आहेत, त्यात असे लक्षात आले की, झोप पुरेशी न घेतल्यामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचा या आजरांचा धोका निर्माण होऊ शकतो.
एखाद्या सदृढ व्यक्तीनं पुरेशी झोप न घेता काही रात्री जागून काढल्या तर त्या व्यक्तीचं शरीर प्री-डायबेटिक अवस्थेमध्ये जाऊ शकतं.
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते, असं संशोधक सांगतात.
जर समजा तुम्ही सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतली तर पुरेशी झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्हाला सर्दी होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी झोप न मिळाल्यामुळं आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि लसीकरणाचा प्रभाव कमी होतो.
झोप पुरेशी न घेतल्यामुळे वजन वाढू शकतं. झोप पुरेशी न झाल्यामुळं शरीरातलं ग्रेलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळं तुम्हाला भूक लागली आहे असं वाटत राहतंलेप्टिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण कमी होतं.
प्रत्येक अवस्था ही 60 मिनिटं ते 100 मिनिटांची असते. झोपेत असताना शरीरात जे बदल होतात त्यावेळी या झोपेच्या अवस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.