Priya More
श्रीखंड खायला अनेकांना प्रचंड आवडते. श्रीखंड खायला खूपच चविष्ट असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच श्रीखंड आवडते.
श्रीखंड खाल्ल्यामुळे सर्दी-खोकला झाल्याची तक्रार काही जण करतात.
हेच श्रीखंड सर्दीवरचे गुणकारी औषध आहे. त्यासाठी हे श्रीखंड विशिष्ट पद्धतीने खावे लागते.
श्रीखंड हे वसंत ऋतूमध्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसात श्रीखंड खाल्ल्याने त्रास होत नाही.
मार्केटमधून कोणत्याही ब्रँडचे श्रीखंड घेऊ या. ते रूम टेम्परेचरवर आणा.
अर्धा किलो श्रीखंडाला एक चमचा सूठ पावडर, चिमूटभर सैंदव मीठ घालून मिक्स करून ठेवा.
या श्रीखंडामध्ये भीमसेनी कापूरचा मुगाच्या डाळीऐवढा खडा घेऊन त्याचा चुरा करून तो त्यामध्ये मिक्स करा.
अशापद्धतीने श्रीखंड खाल्ले तर तुमची सर्दी लवकर बरी होईल.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.