Rohini Gudaghe
शरीरात रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा आहारात समावेश करा.
सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते.
नियमित बीट खा
रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खाल्ल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं.
दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. तिळाची पेस्ट करुन त्यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस ते मिश्रण खा. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
दिवसातून एकदा गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन काढा तयार करुन प्या.
मीठ आणि लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्ताचे प्रमाण वाढते.
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT: Health Tips: मासिक पाळी येण्यापुर्वी पाय का दुखतात; जाणून घ्या