Hair Care Tips: केसात कोंडा झालाय? 'हे' उपाय करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे या सारख्या समस्या होतात. केसांमध्ये कोंडा झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स होत असतात.

Lifestyle | Yandex

कोंडा

केसांमध्ये कोंडा कमी करणं हे अतिशय आव्हानात्मक काम असतं. केसामधील कोंडा कमी करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.

Dandruff | Yandex

नारळाचं तेलात लिंबाचा रस

केसामध्ये कोंडा झाल्यास दोन चमचे नारळाचं तेलात लिंबाचा रस घालून एक मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना लावा. साधरण ५ ते १० मिनिटं हे मिश्रण लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत.

Lemon juice in coconut oil | Yandex

दही

केसामध्ये कोंडा असेल तर दही खूप उपयुक्त ठरते. केसांना दही लावावी. साधरण १० ते १५ मिनिटं दही केसांना लावून ठेवावी. त्यानंतर केस धुवून काढावेत. यामुळे केस चमकदार होतात आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.

Curd | Yandex

कंगवा

तुमच्याही डोक्याच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर दुसऱ्या कोणाचा कंगवा वापरणं टाळा. तसेच केस विंचरल्यानंतर कंगवा हा स्वच्छ करावा.

Comb | Yandex

संत्र्याच्या सालीचा रस

केसामध्ये कोंडा असेल तर संत्र्याच्या सालीचा रस टाळूवर लावावा. या रसाने टाळूची मसाज करावी. १० ते १५ मिनिटे ठेवून त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

Orange peel juice | Yandex

कोरफड

कोरफडाचा गर देखील केसामधील कोंडा घालवण्यासाठी खूप फायदेशीर असतो आणि त्यामुळे केस दाट आणि मुलायम होण्यास देखील मदत होते.

Aloe Vera | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: आळस पळवून लावणारे '5' पदार्थ

Avocado | Canva