ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरोदरपणात महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांमधून जावे लागते.
अनेक समस्यांमध्ये पायाला सूज येणेही एक सामान्य समस्या असते.
आज काही घरगुती उपाय पाहूयात ज्यांचा फायदा गरोदर महिलांना नक्की होईल.
गरोदर महिलांना पायाला सूज आल्यास कोमट पाण्याने पाय शेकावे.
पाय सुजल्यास कोमट तेल करुन त्याने पायाची मसाज करावी.
हर्बल टीच्या सेवनाने पायाची सुज कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.