ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना चहा पिण्याची फार आवड असते. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
काही लोकांना चहा पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असते. पण चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य आहे का? हा कधी विचार केलाय का?
चहा आणि कॉफी पोटात गेल्यावर अॅसिड तयार करतं. यामुळे चहा किंवा कॉफीमुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढत असतो.
चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यायल्यास आजारांचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
चहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो. जो कॅफेनमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे पोटात अॅसिड तयार होते आणि दात खराब होतात.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ते शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यापेक्षा चहा पिण्याच्या 10 -15 मिनिटे आधी पाणी पिणं योग्य मानले जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़