ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भरपूर लोकांना दुधी भोपळ्याची चव आवडत नाही, पण दुधी आरोग्यासाठी भरपूर फायदेशार मानली जाते.
दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि झिंक असते ज्यामुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या येत नाही.
दुधीमध्ये भरपूर खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमची नैसर्गिक आणि निरोगी वाढ होते.
दुधी भोपळ्याच्या रसामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
दुधी भोपळ्याच्या सेवनामुळे त्वचा गुळगुळीत आणि कोमल होण्यास मदत होते.
दुधी भोपळ्याच्या रसामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेल नियंत्रणात राहते, त्यामुळे मुरुम आणि पुरळ या सारखी समस्या होत नाही.
दुधी भोपळ्याच्या रसामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्या खालील काळी वर्तुळ कमी होण्यस मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.