Manasvi Choudhary
भारतात चहा प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत चहा पिण्याची सवय अनेकांना असते.
तर अतिप्रमाणात चहा प्यायल्याने आरोग्य देखील बिघडू लागते.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी चहाचे सेवन करू नये असे डॉक्टर सांगतात.
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. रक्तदाब असलेल्या रूग्णांनी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याची पातळी वाढते.
उच्च रक्तदाब असलेले लोक चिंता, तणाव असल्यास चहा पिऊ नये. त्यांनी चहा प्यायल्यास बीपी वाढण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. . ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रक्ताभिसरणही सुधारते.