Manasvi Choudhary
भारतात चहा पिण्याची सर्वांनाच आवड आहे.
प्रत्येक घरोघरी सवयीनुसार सकाळ - सायंकाळ चहा हा हवाच असतो.
अनेकजण झोपेतून उठल्यानंतर दिवसाची सुरूवात चहाने करतात.
मात्र काही लोक चहा पित नाही त्यांच्यामते चहा प्यायल्याने त्वचेचा रंग काळा होतो.
खरंच चहा प्यायल्याने रंग काळा होतो का ते जाणून घेऊया
चहा प्यायल्याने आपण काळे होते असं म्हटलं जायचं. पण यामध्ये किती तथ्य आहे याची माहिती समोर आली नाही
म्हणूनच चहा प्यायल्याने रंग काळा होतो असं म्हणणे चुकीचे ठरेल
चहा प्यायल्याने त्वचा काळी पडते असे कुठेही झालेलं नाही.
त्वचेचा रंग हा आपल्या जिवनशैली तसेच मेलेनिन जेनेटिक्सवर अंवलंबून असतो
यामुळे चहाच्या रंगाचा आणि आपल्या रंगाचा काहीही संबंध नसतो.