ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे पौष्टिक आणि उपयुक्त मानले जाते. मनुका हा भारतातील एक अतिशय लोकप्रिय ड्राय फ्रूट आहे जो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरले जाते.
आयुर्वोदामध्ये, मनुक्यांना औषधी वनस्पती म्हटले जाते. मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, लोह, पोटॅशियम, इत्यादी पोषक घटकांचा समावेश असतो ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.
मनुक्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात त्यामुळे त्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
भिजवलेल्या मनुकांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हाय ब्लड प्रेशरच्या समस्या असतील तर, सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे सेवन करावे.
भिजवलेले मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पोटा संबंधीत समस्या दूर होतात. याशिवाय मनुके खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
भिजवलेले मनुके हाडांच्या आरोग्या साठी फायदेशीर मानले जातात त्यामधील बोरॉन आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट या पोषक घटकांचा भरपुर प्रमाणात समावेश असतो त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़