Priya More
ब्रेस्ट कॅन्सर हा सामान्यता महिलांना होतो असे म्हटले जाते. पण आता पुरूषांनाही बेस्ट कॅन्सरचा धोका आहे.
ब्रेस्ट कॅन्सर हा धोकादायक आजार आता पुरुषांमध्येही वेगाने पसरत आहे.
महिलांपेक्षा पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जरी कमी असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही ब्रेस्ट टिशू असतात. त्याठिकाणी कॅन्सर होणारे टिशू वाढू शकतात.
पुरूषांनी ब्रेस्टमध्ये जाणवणारी कोणतिही गाठ असो अथवा कोणतेही दुखणे असो त्याकडे दुर्लक्ष करू नका.
ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त महिलांचा आजार आहे असं समजून पुरूष याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करू नका.
पुरूषांना जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्यांच्या काखेत गाठी तयार होतात.
पुरूषांना जर ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तनाभोवतीची त्वचा नारंगी किंवा पिवळी पडल्यासारखी दिसते.
पुरूषांना जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर स्तनातून रक्तस्राव देखील होऊ शकतो.