Priya More
तुम्ही घरामध्ये वापरत असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरची देखील एक्सपायरी डेट असते.
गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट चेक करून घेणं गरजेचे आहे. नाही तर ते धोकादायक ठरू शकते.
गॅस सिलिंडर जास्त काळ उच्च दाबाखाली गॅस साठवून ठेवतो. कालांतराने सिलिंडरचा धातू कमकुवत होतो.
सिलिंडरचा धातू कमकुवत झाल्यावर गळत होणे किंवा फुटण्याचा धोका असतो.
गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ती A, B, C, D या इंग्रजी अक्षरात असते.
A, B, C, D या अक्षरांपुढे शेवटी दोन अंकी संख्या लिहिली जाते. हा कोड सिलिंडरच्या चाचणी आणि एक्सपायरीबद्दल माहिती देतो.
A अक्षर म्हणजे या सिलिंडरची एक्सपायरी जानेवारी-मार्चपर्यंत आहे.
B अक्षर म्हणजे या सिलिंडरची एक्सपायरी एप्रिल-जूनपर्यंत आहे.
C अक्षर म्हणजे या सिलिंडरची एक्सपायरी जुलै-सप्टेंबरपर्यंत आहे.
D अक्षर म्हणजे या सिलिंडरची एक्सपायरी ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत आहे.
जर सिलेंडरवर C-25 लिहिले असेल तर याचा अर्थ या सिलेंडरची एक्सपायरी डेट जुलै ते सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.