Manasvi Choudhary
कारले हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, फायबर आणि लोह असे अनेक पोषक घटक आहेत.
कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने चवीला कडू कारलं खायला अनेकजण टाळतात
कारले चवीला कडू असले तरी पोष्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे.
निरोगी आरोग्यासाठी कारले खाण्याचा सल्ला मोठ्या मंडळीकडून दिला जातो
कारले खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते तसेच कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
कोंड्याची समस्या असल्यास कारल्याच्या पानांचा रस करून केसाला लावावा. तसेच कारल्याच्या भाजीचे सेवन देखील करावे
कारल्याच्या नियमित सेवनामुळे रक्तातील साखर कमी होते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले आणि त्याचा रस खाण्याचा सल्ला दिला जातो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या