ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपण्यापूर्वी नाईट क्रिम म्हणून तूप वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
त्वचेवर सूज कमी करण्यासाठी, झोपण्यापूर्वी त्वचेवर तूप लावा. सकाळी उठल्यावर चेहरा धुण्यापुर्वी सूती कपड्याने स्वच्छ करा.
ओठानां तूप लावल्यामुळे ते मऊ आणि गुलाबी राहतात.
चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे त्यावरील लालसरपणा, खाज आणि अन्य समस्या दूर होऊ शकतात.
तुमची त्वचा कोरडी असल्यास त्यावर तूप लावा त्यामुळे त्वचा मॉइस्चराइज होते.
चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे त्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.
झोपण्यापुर्वी डोळ्याभोवती गोलाकार तूप लावा. यामुळे डोळ्याखालील वर्तुळे हलकी होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.