Shraddha Thik
पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.
अनेकजण जेवल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे? जाणून घ्या
कधी ऊर्जा वाढविण्यासाठी तर कधी हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली की स्नॅक्स खातात.
काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि आहार सुधारण्यासाठीही स्नॅक्स खातात.
एखाद्या वेळेस स्नॅक्स खाणे वाईट नाही; पण तुम्ही सातत स्नॅक्स खात असाल, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कॅलरीयुक्त स्नॅक्स तुम्ही नियमित खात असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. त्याशिवाय आहारात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते.
त्यामुळे फार भूक लागत नाही आणि सतत खाण्याची इच्छासुद्धा होत नाही.