Priya More
पावसाळा सुरू झाल्यानंतर मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात मक्याचे कणीस विकण्यासाठी येतात.
पावसाळ्यामध्ये गरमा गरम मक्याचे कणीस खाण्याची सर्वांची इच्छा होता.
मक्याचे कणीस खायला खूप चविष्ट लागते. ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते.
मक्यामध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२ ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असते.
मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक असल्याचे म्हटले जाते.
मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर पचनाशीसंबंधित समस्या निर्माण होतात.
मक्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि स्टार्च असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर पोटदुखी होऊ शकते.
मका खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर गॅस आणि अॅसिडिटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.
मका खाल्ल्यानंतर ४५ ते ६० मिनिटांनंतरच पाणी प्यावे. यामुळे त्रास होणार नाही.
गरम, ताजा, उकडलेला किंवा भाजलेला मकाच खा. यामुळे देखील त्रास होणार नाही.