गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Bharat Jadhav

लवंग

सिझिजियम अरोमॅटिकम झाडाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या असलेल्या लवंगा केवळ मसाल्याची चव वाढवणारेच नाहीत तर आरोग्याचा खजिना देखील आहेत.

एक लवंग अनेक आजारावर गुणकारी

दररोज एक लवंग चावण्याची सवय तुमच्या शरीराला अनेक फायदे देणारी आहे. ही छोटी लवंग तुमच्या श्वासाला ताजेतवाने करते, पचन सुधारते. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासदेखील मदत करत असते.

आजारांचा धोका कमी होतो

लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सना नष्ट करतात.यामुळे वृद्धत्व कमी होते आणि हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

सांधेदुखीपासून आराम

तसेच शरीरातील जळजळ कमी करते.लवंगातील युजेनॉल सांधेदुखी, स्नायू कडक होणे आणि सूज यापासून आराम देते.

दातदुखीपासून आराम

तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग खूप प्रभावी मानले जाते. ते दातदुखीपासून आराम देतात. तोंडाची दुर्गंधी दूर करतात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासही उपायकारक आहे.

अपचनची समस्या होईल दूर

जेवण केल्यानंतर जडपणा किंवा गॅस झाल्या सारखं वाटत असेल तर लवंग चावणे खूप उपयुक्त ठरू शकतं. लवंग पाचक एंजाइम सक्रिय करते, ज्यामुळे गॅस, आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या दूर होत असतात.

संसर्गापासून संरक्षण

लवंग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवत असतात.

कोलेस्ट्रॉल होते कमी

दररोज लवंग चावल्याने हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.

Cholesterol

हेही वाचा

येथे क्लिक करा

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?