ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मैदाच्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड जास्त हेल्दी मानले जाते. अनेक पदार्थांमध्ये या ब्रेडचा वापर केला जातो.
दररोज ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
ज्या लोकांना ग्लुटेनची अॅलर्जी आहे, त्या लोकांसाठी ब्राऊन ब्रेड खाणं हानिकारक ठरु शकते.
ब्राऊन ब्रेडमध्ये आर्टफिशयल रंगाचा प्रिजरव्हेटिव्हचा वापर केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
या ब्रेडमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते यामुळे वजन वाढू शकते.
हे ब्रेड दररोज खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. मधुमेही रुग्णांनी हे ब्रेड खाणं टाळावे.
ब्राऊन ब्रेडमध्ये फाइटिक अॅसिड असते म्हणून हे रोज खाल्ल्याने शरीरात मिनरल्सची कमतरता निर्माण होऊ शकते.