ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कूर्गला भारतातील स्कॉटलँड देखील म्हटले जाते. येथील हिरवेगार डोंगर, शांत वातावरण आणि नैसर्गिक सुंदरतेसाठी हे तंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
कपल्ससाठी कुर्ग हे परफेक्ट रोमँटिक डेस्टिनेशन आहे, येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.
मडिकेरीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेले अब्बी फॉल्स हे प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.
कुर्गमधील वाइल्डलाइफ सफारीला भेट द्यायला विसरु नका, तुमचा येथील प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल.
येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ब्रम्हगिरी पर्वतवर ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
येथे तुम्ही धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेऊन शांत वेळ घालवू शकता. तसेच येथे सुंदर कॉफीच्या मळ्यांना भेट देऊ शकता.
कुर्गमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हॉटेल्स, विला किंवा लक्झरी रिसॉर्ट देखील मिळतील. जेथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.