Chetan Bodke
दररोजच्या जेवणामध्ये आपण हिरवी मिरचीचा समावेश करतो, ती मिरची कापताना आपल्या बोटांना जळजळ होते.
त्यामुळे आपण अशा काही टीप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे हाताची जळजळ होणार नाहीत.
हिरवी मिरची कापल्यानंतर जर तुमच्या हाताची जळजळ होत असेल हाताची तेल मालिश करावी. तेल मालिश केल्यामुळे हात थंड राहते.
हाताची जळजळ कमी करण्यासाठी हाताला दही लावावी. हाताची ५ मिनिटे मालिश करावी. त्यामुळे हाताला आराम मिळतो.
सोबतच, मिरची कापताना तुम्ही हँड ग्लोव्हजही वेअर करू शकता. त्यामुळे आपले हात सुरक्षित राहतात.
कोरफड आपल्या स्किनला थंड ठेवते. मिरची कापल्यानंतर जर हाताची जळजळ होत असेल तर कोरफड जेलने हाताची मालिश करावी.
हिरवी मिरची कापल्यानंतर जर हाताची जळजळ होत असेल ओलिव्ह ऑईलने हाताची मालिश करावी.
मिरची कापल्यानंतर हाताची होणारी जळजळ थांबवण्यासाठी मधाचा वापर करु शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.