Chetan Bodke
गाईच्या दूधापेक्षा बकरीचे दूध हे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असते.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच बकरीचे दूध फायदेशीर आहे.
खरंतर शेळी अनेक औषधी वनस्पती, झाडे- झुडुपे, हिरवी पानं खात असल्यामुळे तिच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. शेळीच्या दुधामुळे आपले मानसिक, शारिरीक आरोग्य व्यवस्थित राहते.
शेळीच्या दुधामध्ये कॅल्शियम, पॉटेशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रोलचे प्रमाण शरीरामध्ये जास्त असल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरु शकते.
गाईच्या दूधापेक्षा शेळीचे दूध पचण्यास हलके आहे. कारण गाईच्या दूधामध्ये असणाऱ्या प्रथिन्यांपेक्षा शेळीच्या दूधामध्ये असलेले प्रथिने लवकर पचतात.
शेळीच्या दूधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेळीचे दूध हाडांसाठी उपयुक्त ठरु शकते.
शेळीच्या दुधामध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
शेळीच्या दूधामध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी ॲसिडसचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.