Chetan Bodke
आपण सर्वच लवंगाचा वापर गरम मसाल्यामध्ये आवर्जून करतो. पण हाच लवंग आपल्या शरीरासाठी खूप उपायकारक आहे.
सध्या हिवाळा ऋतु सुरु आहे. हिवाळ्यामध्ये लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला आराम मिळेल.
चला तर जाणून घेऊया लवंगाचे काही गुणकारी फायदे...
लवंगाच्या पाण्यामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये अनेक फायदे होतात.
लवंगाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे यकृत निरोगी राहते. लवंगामध्ये आढळणारा युजेनॉल घटक लवंगामध्ये यकृताला अनेक रोगांपासून वाचवते आणि त्याचे कार्य सुधारते.
एका संशोधनानुसार, लवंगामध्ये नायजेरीसिन नावाचा एक विशेष घटक आढळतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि रक्तातील साखरेमध्ये नियंत्रण ठेवते.
जर कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, रात्री एक कप पाण्यात दोन लवंगा भिजवून सकाळी त्याचं सेवन करावं.
हिवाळ्यामध्ये लवंगाचे पाणी अतिशय गुणकारी मानले जाते. त्यामध्ये, 'व्हिटॅमिन सी' चे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडं व्यवस्थित राहतात. लवंगामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांसंबंधित आजारापासून आराम मिळेल.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी त्यासाठी लवंगाचे पाणी उपयुक्त आहे. शरीरातील मेटबॉलिज्म वाढते आणि लवकर वजन कमी होते.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंगाचे पाणी खूप प्रभावी मानले जाते. त्यात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी गोष्टी आढळतात.