Chetan Bodke
मखाना आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम आहे. मखाना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका देऊ शकतो.
मखान्यात कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स, फॉस्फरस, सोडियम सारखे प्रमुख घटक असतात.
मखान्याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पोटाचे आजार दूर होतात.
मखान्याचे सेवन दुधात उकळून केल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
मखानामध्ये अँटी एजिंग फूडसारखे काम करते. मखान्यामध्ये केम्पफेरॉल नावाचे घटक आहे. यामुळे स्किन सुंदर आणि निरोगी राहते.
मखान्याचे सेवन केल्याने चयापचय क्रिया सुधारते, त्यामुळे वजन कमी होते.
मखान्यामध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहाते.
सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.