Manasvi Choudhary
वयाच्या तिशीनंतर महिलांनी स्वत:च्या आरोग्याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे.
महिलांनी आरोग्याविषयक आवश्यक चाचण्या करून घेणे गरजेचे आहे.
भविष्यातील आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी वयाच्या तिशीमध्ये महिलांनी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
मधुमेह किंवा वजन जास्त असणाऱ्या महिलेनी मधुमेह तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.
तीशीमध्ये असताना प्रत्येक महिलेने गर्भाशयाशी संबंधित पॅप स्मीअर टेस्ट करावी.
पॅप स्मीअर टेस्टमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होते.
प्रत्येक महिन्यात महिलांनी रक्तदाब तपासून घ्यावा. उच्च रक्तदाबाचा परिणाम किडनी, हृदय आणि मेंदूवर होतो.
तिशी पार केल्यानंतर महिलांनी ड जीवनसत्त्वाची टेस्ट करणे महत्वाचे आहे. शरीरात ड जीवनसत्त्व कमी असल्यास हाडे कमकुवत होतात.
थकवा, भूक, स्नायूचं दुखणे असेल तर महिलांनी थायरॉइडची चाचणी करावी.