Chetan Bodke
बदलत्या जीवनशैलीमुळे फार कमी वयातच पाठदुखी सुरू झाली आहे. पाठदुखीची समस्या खरंतर सर्वसामान्य झाली. ही समस्या लहान वयात देखील दिसून येते.
आम्ही तुम्हाला काही घरगुती टीप्स सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला पाठदुखीपासून काही प्रमाणात आराम मिळेल. जाणून घेऊया...
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही वॉकिंग आणि बॉडी स्ट्रेचिंग सारखा व्यायाम करू शकता. त्यामुळे पाठदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ लागतो.
पाठदुखीसाठी मोहरीच्या तेलाने मालिश करावी. त्यामुळे पाठीला आराम मिळतो. पाठीची मालिश तुम्ही अंघोळीला जाण्यापूर्वी करावी.
आपण कायमच कामामुळे तासंतास लॅपटॉप समोर बसतो. त्यामुळे आपली पाठ दुखते. मान ताठ ठेवून काम केल्यामुळे पाठदुखी होण्याची शक्यता आहे.
पाठदुखीपासून आराम मिळविण्यासाठी हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याची बाटली वापरू शकता. कंबरेला हीटिंग पॅड लावल्याने वेदना तर कमी होतेच पण सूज येण्यापासूनही आराम मिळतो.
पाठदुखीसाठी निलगीरीचे तेलही खूप उत्तम आहे. निलगीरीचे तेल अंघोळ करताना पाण्यात मिक्स केल्याने पाठीला आराम मिळेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.