Chetan Bodke
शरीरासाठी ताक थंड असतं. जेवण झाल्यानंतर ताकाचं सेवन केल्याने अन्न उत्तम पद्धतीने पचते.
ताक आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो, त्यासोबतच शरीरामध्ये थंडावा कायम राखतो.
ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. सोबतच शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते.
दह्यामध्ये बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक ॲसिड असते. ताकामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील आतडे व्यवस्थित राहते.
ताकामुळे अनेक पोटाचे आजार बरे होतात. फूड पॉईझनसारख्या आजारांचा त्रास होत नाही.
ताकामध्ये कॅल्शियम असते. शरीरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असावे. यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात.
ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, त्यामुळे आपली त्वचा उत्तम राहते. ताकामुळे त्वचा चमकदार आणि क्लिन राहते.
ताकामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन आणि खनिजे मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोट भरल्यासारखे राहते. वजन कमी करण्यासाठी ताक उत्तम आहे.