Chetan Bodke
नेहमीच आपण सुंदर दिसण्यासाठी आपल्या आहारात फळांचा समावेश करतो, त्याच फळ्यांच्या साली फेकुन न देता, नितळ त्वचेसाठी वापर करु शकता.
प्रत्येक ऋतूमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेतो. सुंदर आणि नितळ त्वचेसाठी तुम्ही फळ्यांच्या सालींचा वापर करू शकता.
अशा अनेक फळं आणि फळ भाज्या आहेत, त्यांच्या सालींचा वापर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर करू शकता.
डाळिंबाची साल कायमच चेहेऱ्यावर लावावी. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कायम राहतो.
संत्रीमध्ये व्हिटामिन सी असते. सुकवलेल्या संत्र्याची साल आणि दुध किंवा मध मिसळून स्क्रब म्हणून चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो.
सफरचंद शरीरासाठी उत्तम आहे. सफरचंदाची साल चेहऱ्याला लावल्याने स्किनवरील ग्लो कायम राहतो.
चेहरा क्लिन ठेवण्यासाठी केळीचे साल उपयोगी आहे. केळीचे साल आपला चेहरा मऊ आणि सुंदर ठेवते.
पपईची साल चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा कोरडा राहत नाही. त्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो कायम राहतो आणि चेहरा क्लिन राहतो.