ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपेत असताना अनेकांच्या हातांना अचानक मुंग्या येतात. हा त्रास नेहमीचाच असतो. पण त्याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका.
झोपेत कधी-कधी काहींच्या हाताला मुंग्या येतात. हात पूर्णपणे जड होतात. संवेदना हरवून जातात. पण ही बाब अतिशय गंभीर असू शकते. त्यासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काहींना हा त्रास अतिशय किरकोळ वाटतो. त्यामुळं त्याकडे दुर्लक्ष होतं. पण यामुळं हृदयविकार, स्ट्रोकचा धोका असण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यानं असं होऊ शकतं.
हातापायाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी झोपेची स्थिती सुधारायला हवी. चांगले पोश्चर ठेवायला हवं.
झोपताना शरीरातील रक्ताभिसरणात अडथळे आल्यावर गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे घट्ट कपडे शक्यतो घालणे टाळले पाहिजेत. सैल आणि हलक्या ब्लँकेटचा वापर केला पाहिजे.
हाताला मुंग्या आल्याने श्वास घ्यायला अडचण आणि चक्कर येऊ शकते. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
स्नायूंच्या कमकुवतपणामुळे सुद्धा हाताला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यासाठी व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता कारणीभूत ठरते.
हाताला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.