Manasvi Choudhary
पावसाळ्याच्या दिवसात सर्दी- खोकला यासांरख्या आजारांचा धोका अधिक असतो. छातीत कफ साचणे साचल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे आणि अस्वस्थ वाटते.
या समस्यांवर तुम्ही वारंवार गोळ्या किंवा औषधे घेण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.
आल्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तुम्हाला त्वरीत आराम देतील. आल्याचा चहा किंवा काढा घसा आणि छातीतील जळजळ कमी करतात.
घशातील खवखव आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
लवंग हा रामबाण उपाय मानला जातो. लवंगेच्या उष्ण प्रभावामुळे छातीत जमा झालेला कफ पातळ होण्यास मदत होते.
तुळशीची पाने आणि आल्याचा रस शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते यामुळे तुम्ही कोमट पाण्यात तुळशीची पाने किंवा आल्याचा रस मिक्स करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाटी योग्य सल्ला घ्या.