Health Care: सलग २१ दिवस नाश्त्यात एक केळं आणि एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते

केळ्यातील नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला झटपट ऊर्जा देतात. सफरचंदातील पोषक घटकही शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

Apple | yandex

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

केळं आणि सफरचंद दोन्हीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊन पचनक्रिया सुरळीत राहते.

Banana

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

Apple | GOOGLE

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तर सफरचंदातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास सहाय्य करतात.

Banana

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

दोन्ही फळांमधील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे कमी होऊ शकते.

apples | pinterest

त्वचेला नैसर्गिक चमक मिळू शकते

फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.

Banana

शरीरातील पोषणतत्त्वांची पूर्तता होते

केळ्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 असते, तर सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.

Apple | GOOGLE

Face Care: ओपन पोर्स कमी करुन नॅचरली मॉइश्चरायझ चेहरा हवाय? रात्री झोपताना ही पेस्ट ५ मिनिटं नक्की लावा

Face Care | Pintrest
येथे क्लिक करा