Face Care: ओपन पोर्स कमी करुन नॅचरली मॉइश्चरायझ चेहरा हवाय? रात्री झोपताना ही पेस्ट ५ मिनिटं नक्की लावा

Shruti Vilas Kadam

फेस पॅक तयार करण्याची पद्धत

दोन चमचे ताजे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात एक चमचा गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करून चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार ठेवा.

Face Care | Saam Tv

त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझेशन मिळते

कोरफड त्वचेला खोलवर हायड्रेट करते, तर गुलाबपाणी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.

Face Care

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो

या दोन्ही घटकांमधील पोषक गुणधर्म त्वचेचा निस्तेजपणा कमी करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात.

Face care | Saam TV

पिंपल्स कमी होतात

कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर गुलाबपाणी त्वचेला शांत ठेवते. त्यामुळे पिंपल्स आणि त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

Face Care | Saam Tv

त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करते

सूर्यप्रकाशामुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचेवर आलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफड आणि गुलाबपाणी प्रभावी ठरू शकतात.

Face Care | Saam tv

त्वचेचे छिद्र (Pores) स्वच्छ ठेवते

गुलाबपाणी नैसर्गिक टोनरचे काम करते. ते त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करून छिद्र स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

Face care | Saam TV

वापरण्याची योग्य पद्धत

चेहरा स्वच्छ धुवून कोरफड आणि गुलाबपाण्याचे मिश्रण रात्री झोपताना लावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यास त्वचेमध्ये ताजेपणा आणि चमक दिसून येऊ शकते.

Face Care | Saam Tv

Hair Care: पार्लरमधला खर्च नकोय? मग या पेस्टने केसांना मिळेल नॅचरल शाईन आणि सॉफ्टनेस

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा