Shruti Vilas Kadam
दोन चमचे आळशी बिया एका कप पाण्यात उकळा. जेलसारखा घट्ट पोत तयार झाल्यावर गाळून घ्या. त्यात दोन ते तीन चमचे ताजे कोरफडीचे जेल मिसळा आणि चांगले एकजीव करा.
कोरफडमध्ये असलेले एन्झाइम्स आणि आळशीतील ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स टाळूचे पोषण करतात. त्यामुळे केसांच्या मुळांना बळ मिळते आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.
आळशीतील प्रथिने आणि कोरफडीतील जीवनसत्त्वे केसांच्या मुळांना मजबूत करतात. नियमित वापरामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होऊ शकते.
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे टाळू स्वच्छ ठेवून कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात.
ही पेस्ट केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. त्यामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतात.
आळशीपासून तयार होणारा जेलसारखा पोत केसांना नैसर्गिक कंडिशनिंग देतो. त्यामुळे केसांचा गुंता कमी होऊन फ्रिझीनेस नियंत्रित होतो.
तयार पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. 30 ते 45 मिनिटे ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.