Health Care: पावसाळ्यात पोट सारखं बिघडतं? मग जेवणात या ५ भाज्या आजपासूनच खायला करा सुरुवात

Shruti Vilas Kadam

भोपळा

पावसाळ्यात भोपळ्याचा आहारात समावेश करू शकता. यात व्हिटामिन A मुबलक प्रमाणात असते आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळतो. याची भाजी किंवा सूप घेता येते.

Red Pumpkin Benefits | Saam Tv

दुधी भोपळा

पावसाळ्यात पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील तर दुधी भोपळा आहारात घेणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनसंस्थेच्या आरोग्याला मदत मिळते.

Bottle Gourd | Yandex

दोडका

दोडका ही पावसाळ्यात खाण्यासाठी चांगली हिरवी भाजी मानली जाते. शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पचनक्रियेला आधार देण्यास ती मदत करू शकते.

Ridge Gourd | Yandex

सुरण

सुरणमध्ये फायबर आणि खनिजे असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि मलविसर्जनाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

Suran Fry Recipe

पडवळ

पडवळची भाजी किंवा त्याचा चोखा पावसाळ्यात खाऊ शकता. यामुळे अॅसिडिटी आणि पोट फुगण्यासारख्या समस्या कमी ठेवण्यास मदत होऊ शकते.

Padwal Curry | yandex

ताज्या भाज्या निवडा

पावसाळ्यात भाज्यांमध्ये ओलाव्यामुळे बुरशी किंवा किडे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ताज्या, स्वच्छ आणि व्यवस्थित धुतलेल्या भाज्यांचा वापर करा.

vegetables | pinterest

पचनासाठी हंगामी भाज्यांना प्राधान्य द्या

पावसाळ्यात पचनशक्ती काही प्रमाणात कमजोर होऊ शकते. त्यामुळे आहारात हंगामी भाज्यांचा समावेश केल्यास संतुलित आहार राखण्यास मदत होऊ शकते.

green leafy vegetables | pintrest

Hair Care: तुमचेही केस खूप गळतात? मग हे हेअर ऑइल वापरण्यापूर्वी दोनदा विचार करा

Hair Care
येथे क्लिक करा