ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिंबू हे व्हिटॅमिन C ने भरपूर असलेले फळ आहे. जेवणात लिंबू पिळल्याने चव तर वाढतेच, पण लिंबू आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो.
जेवणात लिंबू पिळल्याने पचनक्रिया सुधारते . लिंबामुळे पोटातील आम्लांचे संतुलन राखले जाते आणि त्यामुळे अन्न नीट पचले जाते.
नियमित लिंबाचा सेवन केल्याने पित्त, अॅसिडिटी आणि पोटातील गॅसचा त्रास कमी होतो. लिंबू शरीराला थंडावा देऊन पोटात ही थंडावा निर्माण करतो.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन C असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
जेवणात लिंबू पिळल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. नियमित सेवनामुळे त्वचा स्वच्छ, फ्रेश आणि चमकदार राहते.
लिंबू शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. त्यामुळे शरीर हलके वाटू लागते आणि आरोग्याला ही फायदा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.