Shruti Vilas Kadam
खोबरेल तेल त्वचेला आवश्यक आर्द्रता पुरवते, तर व्हिटॅमिन ई त्वचेचे पोषण करते. दोन्हींच्या मिश्रणामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ व तजेलदार दिसू लागते.
व्हिटॅमिन ईमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक चमकदारपणा वाढण्यास मदत होते.
हे मिश्रण त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. नियमित वापरामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी दिसण्यास मदत मिळू शकते.
व्हिटॅमिन ई त्वचेच्या पेशींच्या दुरुस्तीत मदत करते. त्यामुळे मुरुमांचे डाग, पिग्मेंटेशन आणि त्वचेवरील किरकोळ खुणा हलक्या होण्यास मदत होऊ शकते.
खोबरेल तेल केसांच्या मुळांना पोषण देते, तर व्हिटॅमिन ई केसांचे नुकसान कमी करण्यास मदत करते. यामुळे केस अधिक मजबूत आणि चमकदार दिसतात.
या मिश्रणाने टाळूला मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळून केस गळती कमी होण्यास मदत होऊ शकते.
खोबरेल तेलातील नैसर्गिक गुणधर्म टाळूला हायड्रेट ठेवतात. व्हिटॅमिन ईसोबत वापरल्यास कोंडा आणि खाजेची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
एका चमचा खोबरेल तेलात 1 ते 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळा. हे मिश्रण त्वचेवर किंवा टाळूवर हलक्या हाताने लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा.