ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या जेवणामध्ये वापरले जाणारे आले आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढण्याची ताकत आपल्याला देते.
आल्याचा चहा शरीराला ताजेतणावे ठेवतो तर आल्याचा रस औषधाचे काम करून आजारांना पळवतो.
नियमित आल्याचा रस प्यायल्यास सर्दी, तापासोबतच पोटाच्याही अनेक समस्या दूर करतो.
या आरोग्यवर्धक आल्याच्या रसाचे फायदे जाणून घेऊयात...
आल्याचे औषधी गुणधर्म मळमळ आणि उलट्यांच्या त्रासावर आराम देतात.
आल्याचा रस रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी करण्यास मदत करतो.
आल्याचा रस आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो. त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकत मिळते.
आल्यातील पोषक तत्वांमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.